Kaviya Maran : हैद्राबादच्या सीईओने वेधलं साऱ्यांचं लक्ष, लिलावादरम्यानचे काव्याचे फोटो व्हायरल
आयपीएल 2021 पासून सनरायजर्स हैद्राबाद संघाचा सामना म्हटलं की खेळाडूंच्या खेळासह प्रेक्षकांमध्ये बसलेली तरुणी काव्या मारनकडेही सर्वांचं लक्ष असतं. (P.C. ipl.com)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाव्या मारन ही सनरायजर्स हैद्राबाद ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. दरम्यान यंदाच्या महालिलावातही काव्या उपस्थित होते. (P.C. ipl.com)
यावेळी काव्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आयपीएलने त्यांच्या अधिकृत साईटवरही तिचे फोटो शेअर केले आहेत. (P.C. ipl.com)
काव्याने लिलावात मुख्य भूमिका पार पाडली, खेळाडू विकत घेतानाही काव्याने पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं. (P.C. ipl.com)
काव्या लिलावादरम्यान सौरव गांगुली तसंच अनेक दिग्गजांसोबत चर्चा करताना दिसून आली. (P.C. ipl.com)
याआधीही अनेकदा काव्या हैद्राबादचे सामने पाहण्यासाठी मैदानात आल्याचं पाहायला मिळालं होतं. (P.C. ipl.com)
दरम्यान यंदा हैद्राबाद संघाने लिलावात वॉशिग्टंन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, राहुल त्रिपाठी अशा काही महत्त्वाच्या खेळाडूंना संघात सामिल केलं आहे.
निकोलस पूरन हा यंदाच्या लिलावात आतापर्यंत हैद्राबादने खरेदी केलेला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला संघाने 10.75 कोटींना विकत घेतलं आहे.