Latur News: लातूर नगरीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थान यात्रेची सांगता
लातूर नगरीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थान यात्रेची सोमवारी सांगता झाली. (सर्व फोटो - सौजन्य श्रीनिवास गाडेकर)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाशिवरात्रीच्या दिवसापासून या या यात्रेला सुरुवात झाली होती.
लातूर नगरीच्या ग्रामदेवतेच्या यात्रेत जिल्हाभरातूनच नव्हे तर कर्नाटक, तेलंगणा आणि मराठवाड्यातून लोक दर्शनासाठी येत असतात.
मंदिर परिसरात असलेल्या भव्य मैदानात विविध वस्तू विक्रीचे दुकाने थाटली जातात.
बालकांसाठी खेळणी व इतर मनोरंजनाची साधने होती.
यात्रेनिमित्ताने आनंदमेळा, रहाट पाळणे यांची उभारणी करण्यात आली होती.
जवळपास 17 दिवस ही यात्रा चालते. 17 दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते
कृषी, हस्तकला प्रदर्शन, आरोग्य शिबिर आणि कुस्त्याचा फड देखील आयोजित करण्यात येतो.
सोमवारी यात्रेची सांगता झाली.
मोठ्या प्रमाणात रोषणाई करत सांगता समारोह साजरा केला जातो.