PBKS vs SRH : पंजाबच्या विजयी कामगिरीला ब्रेक, हैदराबादनं खातं उघडलं; शिखर धवनची खेळी ठरली व्यर्थ, पंजाबच्या पराभवाचं कारण काय?

आयपीएल 2023 मध्ये 14 व्या सामन्यात सनराइजर्स हैदराबादने (SRH) पंजाब किंग्सवर (PBKS) 8 विकेट्सने विजय मिळवला. हैदराबादला पंजाबने 144 धावांचं आव्हान दिलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने 2 विकेट देऊन 145 धावा करत यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे. पंजाबचा कर्णधार शिखर धवनची 99 धावांची खेळी व्यर्थ ठरली.

शिखर धवन नेतृत्व करत असलेल्या पंजाब संघाला पराभवाचा सामना करावा लागला. याचं नेमकं कारण काय आहे, जाणून घ्या.
नाणफेक हरल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या संघाला 20 ओवरमध्ये 9 विकेट देत केवळ 143 धावा करता आल्या.
यात एकट्या शिखर धवनने 99 धावांची खेळी केली असली तरी, इतर फलंदाज मात्र त्याला साथ देऊ शकले नाहीत. शिखरने 12 चौकार आणि 5 षटकारसह 99 धावांची खेळी केली.
सनराइजर्स हैदराबाद संघाच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत पंजाबच्या फंलदाजांना तंबूत परतवलं. स्पिनर मयंक मारकंडेने 4 ओवरमध्ये 15 धावा देत 4 गडी गारद केले.
अलावा मार्को यॉन्सेन आणि उमरान मलिकने प्रत्येकी 2-2 विकेट आणि भुवनेश्वर कुमारने एक विकेट घेत पंजाबच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं.
यंदाच्या हंगामातील हैदराबाद संघाचा हा पहिलाच विजय आहे. या विजयासह सनरायजर्स हैदराबादने आयपीएल 2023 मध्ये खातं उघडलं आहे.