Photo: कृषीमंत्री अब्दुल सत्तार नुकसानीच्या पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर; पाहा फोटो
राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करतायत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत, शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.
अब्दुल सत्तार यांनी बीड जिल्ह्यातील कोळवाडी, धनगर वाडी, पिंपळनई, लिंब गणेश येथे गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
पाहणी करून त्यांनी झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करा तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची गांभीर्याने दक्षता घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
बीड तालुक्यातील कोळवाडीत एक किलोमीटरचा डोंगर पार करून अब्दुल सत्तार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि गारपिटीमुळे झालेल्या शेताची पाहणी केली.
बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री सत्तार यांनी शेतकऱ्यांशी सवांद साधून त्यांना मदतीच आश्वासन दिले.
बीड तालुक्यातील पिंपळनई गावामध्ये गारपिटीमुळे मिरची पिकाचे नुकसान पाहून अब्दुल सत्तार परत येत असताना त्याच गावातील काही महिलांनी तत्काळ मदत जाहीर करावी, यासाठी सत्तार यांना घेराव घातला.
यावेळी सरकार सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं म्हणत या सत्तार यांनी या महिलांचे पाय धरत आणि तत्काळ मदत जाहीर करू अस आश्वासन दिले.
रोजा असतानाही शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी आलो असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.