In Pics : चेन्नईविरुद्ध सामन्यात शिखरचा नवा विक्रम, अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा फलंदाज
भारतीय क्रिकेटमधील गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Punjab Kings Vs Chennai Super Kings) सामन्यात पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजी करावी लागली, यावेळीच शिखरने ही कामगिरी केली.
शिखर धवन (Shikhar Dhawan) याने सुरुवातीच्या दोन धावा घेत एक नवा विक्रम रचला आहे. त्याने आयपीएलमधील 6000 धावांचा टप्पा पूर्ण केला.
विशेष म्हणजे ही कामगिरी करणारा तो जगातील दुसराच फलंदाज आहे.
या सामन्यापूर्वी शिखर धवननं आतापर्यंत आयपीएलचे 201 सामने खेळले होते. ज्यात 34. 67 च्या सरासरीनं त्यानं 5 हजार 998 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि 45 अर्धशतकांचा समावेश होता.
आयपीएलमध्ये तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर असून विराटने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 215 सामन्यांत 36.58 च्या सरासरीनं 6 हजार 402 धावा केल्या आहेत.
त्यानंतर रोहित शर्मा 5 हजार 764 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 221 सामन्यात ही कामगिरी केली आहे. दरम्यान शिखरने नुकत्याच 6 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
सामन्यात शिखरने नाबाद 88 धावा केल्या यावेळी भानुका राजपक्षाने त्याला चांगली साथ दिली.
भानुका याने दोन चौकार आणि दोन षटकार ठोकत 32 चेंडूत 42 धावा केल्या.
चेन्नईच्या गोलंदाजांनी सर्व पंजाबच्या फलंदाजांना भेदक गोलंदाजी केली असता शिखरने एकहाती झुंज दिली.