RR vs RCB : राजस्थान 59 धावांवर गारद, 'करो या मरो' च्या लढतीत आरसीबीचा 112 धावांनी विजय
RR vs RCB : आरसीबीच्या गोलंदाजीपुढे राजस्थानच्या फलंदाजांनी हराकिरी केली. राजस्थानचा डाव अवघ्या 59 धावांत संपुष्टात आला. हेटमायरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने झुंज दिली नाही. 172 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 10.3 षटकात 59 धावांत संपुष्टात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवेन पार्नेल याने तीन विकेट घेतल्या.. आरसीबीने एकतर्फी विजय मिळवत प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलेय. करो या मरो च्या लढतीत आरसीबीने ११२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह आरसीबीने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
१७२ धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. पावरप्लेमध्ये राजस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता. राजस्थानला ११ षटकेही फलंदाजी करता आली नाहीत.
मोक्याच्या सामन्यात राजस्थानने हराकिरी केली. या दारुण पराभवामुळे राजस्थानचे स्पर्धेतील आव्हान खडतर झालेय... प्लेऑफमध्ये पोहचण्याचे चान्स फक्त सहा टक्के राहिलेत.
आरसीबीच्या गोलंदाजीपुढे राजस्थानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. राजस्थानच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. राजस्थानकडून शिमरोन हेटमायर याने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. या खेळीत त्यान चार षटकार आणि एक चौकर लगावला.
त्याशिवाय जो रुट याने दहा धावांची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता राजस्थानच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही. यशस्वी जयस्वाल आणि जो रुट या सलामी फलंदाजाला खातेही उघडता आले नाही. कर्णधार संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कल प्रत्येकी चार धावा काढून तंबूत परतले. तर ध्रुव जुरेल एक धाव काढून बाद झाला. तर अश्विन याला खातेही उघडता आले नाही.
आरसीबीकडून वेन पार्नेल याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. वेन पार्नेल याने तीन षटकात फक्त दहा धावा खर्च केल्या. त्याशइवाय कर्ण शर्मा आणि मिचेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या
ब्रेसवेल याने तीन षटकत १६ धावा दिल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. सिराज याने दोन षटकात दहा धावा खर्च केल्या. मॅक्सवेल याने एका षटकात फक्त तीन धावा दिल्या.