आरसीबीचा दिल्लीवर विजय, विराट कोहलीची अर्धशतकी खेळी

RCB vs DC IPL 2023 Match 20 : वैशाक विजयकुमार याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने दिल्लीचा 23 धावांनी पराभव केला. आरसीबीने दिलेल्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 151 धावांपर्यंत मजल मारु शकला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आरसीबीच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत दिल्लीच्या फलंदाजांना तंबूत धाडले. पावरप्लेमध्ये दिल्लीचे चार फलंदाज बाद झाले होते. मनिष पांडेच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने 150 धावसंख्या पार केली. दिल्लीचा हा सलग पाचवा पराभव होय.

दिल्लीला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही. वैशाक विजयकुमार याने आयपीएल पदार्पणात तीन विकेट घेण्याचा पराक्रम केला.
175 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या एका धावेवर पृथ्वी शॉ धावबाद झाला.. त्याला एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर मिचेल मार्शही गोल्डन डकचा शिकार झाला..
एका धावेवर दिल्लीच दोन फलंदाज तंबूत परतले होते. मिचेल मार्श याला वेन पर्नेल याने तंबूत धाडले. त्यानंतर संघाची धावसंख्या तीन झाल्यानंतर यश धुलही तंबूत परतला. त्याला मोहम्मद सिराज याने बाद केले.
दिल्लीची अवस्था बिकट झाल्यानंतर मनिष पांडे आणि डेविड वॉर्नर यांनी डाव सावरला. दोन्ही अनुभवी फलंदाजांनी संघाची धावसंख्या हालती ठेवली. पण आरसीबीकडून पदार्पण करणाऱ्या वौशाक याने डेविड वॉर्नर याला बाद केले. सहा षटकात 32 धावांच्या मोबदल्यात दिल्लीने चार विकेट गमावल्या होत्या.
आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मनिष पांडे याने दुसऱ्या बाजूला दमदार प्रदर्शन केले. मनिष पांडे याने चौकार षटकारांचा पाऊस पाडला. त्याने अर्धशतकी खेळी करत दिल्लीला विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. पण पांडेला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही.
50 धावांवर मनिष पांडे बाद झाला. त्यानंतर अभिषेक परेल पाच धावा काढून तंबूत परतला. अक्षर पटेल यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो 14 चेंडूत 21 धावांवर बाद झाला. मनिष पांडे याने 38 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. दिल्लीने 98 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. आरसीबीकडे सामना झुकला होता.
अमन खान याने अखेरीस दमदार फलंदाजी करत संघाची धावसंख्या 150 च्या पार नेली. आरसीबीकडून वैशाक विजयकुमार याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज याने 2 विकेट घेतल्या.