gautami Patil lavni show : जुन्नरच्या बंदोबस्ताला मानलं बुवा! ना राडा, ना गोंधळ, गौतमी पाटीलचा कार्यक्रम शांततेत...
संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली नृत्यांगना गौतमी पाटील च्या कार्यक्रमात नेहमीच काही ना काही गोंधळ होत असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिराचीवाडी येथील यात्रेला कोणतंही गालबोट लागू नये, म्हणून चक्क महिला हातात काठी घेऊन उभ्या होत्या.
वेताळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त गौतमी पाटीलच्या शोचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. शांततेत पार पडलेला गौतमीचा हा पहिलाच कार्यक्रम असावा.
या ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून येथील आदिवासी महिला भगिनींसह काही महिलांनी सुरक्षिततेची जबाबदारी घेतली आणि हातात काठ्या घेऊन त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
याशिवाय गौतमी पाटील चे वैयक्तिक काही सुरक्षा रक्षक तर खाजगी कंपनीचे सुमारे 25 बाऊन्सर ही तैनात करण्यात आले होते.
एवढेच नव्हे तर स्टेजच्या समोरच तरुणांची मोठी गर्दी होते म्हणून तेथे महिला रसिकांना बसविण्यात आले होते. त्यामुळेच कोणताही अनुचित प्रकार न घडता किंवा गोंधळ गडबड न होता जुन्नर तालुक्यात गौतमीचा कार्यक्रम शांततेत पार पडला.
यापूर्वी तिच्या अनेक कार्यक्रमात राडा झाल्याने ती वादात सापडली होती.
मात्र दरवेळी तिने स्पष्टीकरणही दिलं होतं.