चुरशीच्या सामन्यात राजस्थानचा पंजाबवर विजय, 'हे' आहेत सामन्यातील महत्वाचे मुद्दे
राजस्थानविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या जॉनी बेअरस्टो आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली.
पंजाबच्या डावातील सहाव्या षटकात आर अश्विनच्या गोलंदाजीवर शिखर धवन झेल बाद झाला.
पंजाबच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून राजस्थानसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. राजस्थानकडून युजवेंद्र चहलनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या आहेत.
पंजाबनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलरनं राजस्थानला संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 46 धावांची भागेदारी केली.
पंजाबच्या डावातील तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कागिसो रबाडानं जोस बटलरला जाळ्यात अडकवलं. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनही स्वस्तात माघारी परतला.
दरम्यान, यशस्वी जैस्वालनं संघाची एक बाजू संभाळत संघाचा डाव पुढे नेला. त्यानं 41 चेंडूत 68 धावांची वादळी खेळी केली
पण संघाला अत्यंत गरज असताना अखेरच्या काही षटकात हेटमायरनं तुफान खेळी केली. त्याने 16 चेंडूत 31 धावांची नाबाद खेळी केली.
हीटमायरच्या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सनं 8 विकेट्स राखून पंजाब किंग्जला पराभूत केलं.
पंजाबकडून अर्शदीप सिंह सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या आहेत. तर, कागिसो रबाडा आणि ऋषी धवन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे.