Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Quinton de Kock Record : क्विंटन डी कॉकची तुफानी खेळी, केले नवे विक्रम नावावर

आयपीएलच्या 66 व्या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करत केकेआरसमोर तब्बल 211 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यावेळी सर्वाधिक नाबाद 140 धावा करणारा क्विंटन डी कॉक सामनावीर ठरला त्याने दमदार रेकॉर्डही नावावर केलं,
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात डी कॉकने आयपीएल 2022 मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली आहे.

आयपीएलच्या इतिहासाचा विचार करता क्विंटन डी कॉकनं 70 चेंडूत ठोकलेल्या नाबाद 140 धावा त्याला सर्वाधिक धावा ठोकणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर घेऊन गेल्या आहेत.
यावेळी क्विंटन डी कॉकनं केएल राहुलसोबत दमदार भागिदारी करत ही कामगिरी केली.
यावेळी केएल राहुलनंही 51 चेंडूत नाबाद 68 धावा कुटल्या. त्यामुळे या दोघांची नाबाद 210 धावांची भागिदारी पहिल्या विकेटसाठी झालेली सर्वात मोठी भागिदारी ठरली आहे.
क्विंटन डी कॉकनं यावेळी केलेल्या 140 धावांमध्ये 10 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता.
क्विंटन डी कॉकनं या खेळीदरम्यान चौफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
या रेकॉर्डसह वैयक्तिक धावसंख्येच्या बाबतीत क्विंटनने एबी डिव्हिलियर्स आणि के एल राहुलला मागे टाकले आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर युनीव्हर्सल बॉल ख्रिस गेल नाबाद 175 धावांसह आहे. त्यानंतर ब्रँडन मॅक्यूलम नाबाद 158 धावांसह दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानावर क्विंटन नाबाद 140 धावांसह आहे. चौथ्या स्थानावर एबी डीव्हिलियर्स नाबाद 133 धावांसह आहे. तर केएल राहुल नाबाद 132 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
क्विंटनच्या या खेळीचं सर्व क्रिकेट जगतातून कौतुक केलं जात आहे.