Bhagyashree Mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटेला सायबर फसवणुकीचा फटका, नेमकं काय घडलं?
Marathi Actress bhagyashree mote
1/10
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटेची आर्थिक फसवणूक झाली आहे.
2/10
इंस्टाग्रामवरुन ईशानी अग्रवाल नावाच्या एका महिलेनं फसवलं असल्याची तक्रार तिनं केलीय.
3/10
शेअर बाजारमध्ये चांगला पैसा मिळेल म्हणून 75 हजार रुपयाची गुंतवणूक करायला भाग्यश्रीला त्या महिलेनं सांगितलं.
4/10
भाग्यश्रीला फसवणूक झाल्याचं कळल्यानंतर आंबोली पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन गुन्हा नोंदवला आहे.
5/10
आंबोली पोलिसांनी या संदर्भात आयपीसी कलम 419, 420 आयटी ॲक्ट, गुन्हा दाखल केले आहेत.
6/10
या संदर्भात अधिक तपास आंबोली पोलीस करत आहेत.
7/10
अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
8/10
तिच्या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
9/10
चिकाटी गडिलो चिथा कोटूडू या तेलगू सिनेमातून तिने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलंय.
10/10
तिनं अनेक मराठी सिनेमा आणि मालिकांमध्येही काम केलं आहे.
Published at : 19 May 2022 01:21 PM (IST)