3 ठिकाणी प्रॉपर्टी, आलिशान गाड्या; मोठ्या कंपन्यांचा ब्रँड ॲम्बेसेडर, ऋषभ पंतची संपत्ती किती?
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. पण या खेळाडूचा प्रवास संघर्षमय राहिलेला आहे. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऋषभ पंत जेव्हा दिल्लीत आला तेव्हा त्याला खूप संघर्ष करावा लागला. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
एक काळ असा होता की तो मोतीबागच्या गुरुद्वारात आईसोबत राहत होता. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
आज ऋषभ पंतची एकूण संपत्ती 100 कोटींच्या आसपास आहे. आयपीएल 2016 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याला 1.9 कोटी रुपयांना खरेदी केले होते, परंतु आता ऋषभ पंतचा आयपीएल पगार 16 कोटी रुपये आहे. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
याशिवाय ऋषभ पंतची दिल्ली, रुरकी, डेहराडून आणि हरिद्वारमध्ये मालमत्ता आहे. ऋषभ पंतच्या दिल्लीतील घराची किंमत अंदाजे 2 कोटी रुपये आहे. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
ऋषभ पंतकडे अनेक आलिशान कार आहेत, ज्यात ऑडी A8 (रु. 1.3 कोटी), एक पिवळी फोर्ड मस्टँग (2 कोटी रुपये) आणि मर्सिडीज-बेंझ GLE (सुमारे 2 कोटी रुपये) यांचा समावेश आहे. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)
याशिवाय ऋषभ पंत अनेक ब्रँडचा ब्रँड ॲम्बेसेडरही आहे. Adidas, JSW, Dream 11, Realme, Cadbury आणि Zomato सारख्या ब्रँडचा ऋषभ पंत ब्रँड ॲम्बेसेडर आहे. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)