IPL 2022 : हैदराबादचा पंजाबवर 7 विकेट्सनी विजय, 'हे' आहेत सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे
आजच्या सामन्यात हैदराबादने आधी भेदक गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजी करत सात विकेट्सनी पंजाबवर विजय मिळवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामन्यात पूरन आणि मार्करम यांची अभेद्य नाबाद भागिदारी हैदराबादच्या विजयात महत्त्वाची ठरली.
पंजाबला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली होती. पण दुखापतीमुळे त्यांचा कर्णधार मयांक नसल्याने याचा फटका त्यांना बसला. दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले
पंजाबचा लियाम सोडता सर्व खेळाडू खराब कामगिरी करु शकल्याने पंजाबने 151 धावा केल्या. लियामने दमदार खेळी करत 60 धावांची महत्तपूर्ण खेळी केली.
दुसरीकडे हैदराबादची गोलंदाजी पाहता त्यांच्या उम्रान मलिकने आज कमालच केली. अखेरच्या षटकात हैदराबादचा उम्रानने दमदार अशा तीन विकेट्स घेतल्या. तर एक खेळाडू धावचीत झाला. त्यामुळे अखेरच्या षटकात एकही धाव न जाता पंजाबचे चार गडी शून्यावर माघारी परतले.
ज्यानंतर 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची पहिली विकेट कर्णधार विल्यमसनच्या (3) रुपात स्वस्तात गेली. पण त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा यांनी एक चांगली भागिदारी रचली.
हे दोघेही बाद झाल्यावर मात्र निकोलस पूरन आणि अॅडन मार्करम यांनी अभेद्य अशी नाबाद भागिदारी रचत 152 धावांचे आव्हान 18.5 षटकात पार केले.
यावेळी पूरनने नाबाद 35 आणि मार्करमने नाबाद 41 रन ठोकले.
पंजाबकडून राहुल चाहरने दोन तर रबाडाने एक विकेट घेतली.
या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत चौथं स्थान मिळवलं आहे.