PBKS vs CSK : चुरशीच्या सामन्यात पंजाबचा चेन्नईवर विजय, हे आहेत सामन्यातील महत्त्वाचे मुद्दे

पंजाब किंग्स
1/10
आयपीएलच्या आजच्या सामन्यात एक रोमहर्षक लढत पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (PBKS vs CSK) संघात पाहायला मिळाली.
2/10
पंजाबने चेन्नईवर 11 धावांनी विजय मिळवला खरा पण सामना अखेरच्या षटकापर्यंत चुरशीचा झाला.
3/10
आजकाल नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे.पण आज मात्र नाणेफेक जिंकूनही चेन्नईचा संघ सामना जिंकू शकला नाही. त्यांना 11 धावांनी सामना गमवावा लागला.
4/10
सामन्याचा विचार केल्यास शिखर धवनने केलेल्या 88 धावांच्या जोरावरच पंजाबने चेन्नईसमोर 188 धावांचे लक्ष्य ठेवले.
5/10
शिखरने भानुका राजपक्षासोबत एक मोठी आणि भक्कम भागिदारी रचली. पण भानुका 42 धावा करुन बाद झाला.
6/10
शिखरने अखेरपर्यंत झुंज देत 59 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकत नाबाद 88 धावा केल्या.
7/10
188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नई संघाचे फलंदाज सुरुवातीपासून चांगल्या फॉर्ममध्ये नव्हते. पण ऋतुराजने बराच काळ क्रिजवर टिकून राहून संघाला सावरलं, अखेर तो 30 धावा करुन बाद झाला.
8/10
त्यानंतर क्रिजवर आलेल्या अंबाती रायडूने एका दमदार खेळीचं दर्शन घडवलं. त्याने 39 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकार ठोक 78 धावा केल्या.
9/10
पण रबाडाने रायडूचा महत्त्वपूर्ण विकेट घेत सामन्याची दिशा बदलली. त्यामुळे रबाडा गेमचेंजर ठरला.
10/10
अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात धोनीने एक चौकार आणि षटकार ठोकला खरा पण अखेरच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद होताच, सामना चेन्नईकडून पंजाबच्या दिशेने झुकला.
Published at : 26 Apr 2022 08:00 AM (IST)