IPL 2023 : धोनी क्रिकेटमधून निवृत्त होणार? सामन्यानंतर 'कॅप्टन कुल'चं मोठं वक्तव्य...
आयपीएलमध्ये (IPL 2023) चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 7 विकेट्सने पराभव केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहैदराबादने चेन्नईला सामना जिंकण्यासाठी 135 धावांचं लक्ष्य दिलं होतं. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 18.4 षटकांत 3 विकेट्स राखून हा सामना जिंकला.
चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा हिरो सलामीवीर डेवॉन कॉनवे ठरला. कॉनवेने 57 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. यामध्ये त्याने खेळीत 12 चौकार आणि एक षटकार ठोकला.
हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
धोनी म्हणाला की, ''आम्ही जे बोललो ते आम्ही केलं आहे. हा माझ्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा आहे, त्यामुळे मी त्याचा जास्तीत जास्त आनंद आणि मजा घेत खेळण्याचा प्रयत्न करत आहे.
धोनी पुढे म्हणाला की, ''एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळणं नेहमीच खास राहिलं आहे. इथल्या लोकांनी खूप प्रेम आणि आपुलकी दिली आहे. चेपॉक स्टेडिअमवर लोक मला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहत असतात.''
महेंद्र सिंह धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यापासून आयपीएल शिवाय कोणत्याही स्पर्धात्मक क्रिकेट सामन्यात भाग घेतलेला नाही.
त्यामुळे आयपीएल 16 वा हंगाम धोनीचा शेवटचा हंगाम असेल, अशी शक्यता चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर धोनी म्हणाला की, 'मी अजून कितीही वेळ खेळलो तरी हा माझ्या करिअरच्या शेवटच्या टप्पा आहे. त्यामुळे याचा आनंद घेणं महत्त्वाचं आहे.'
धोनीने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून 200 हून अधिक सामने खेळले आहेत.
image 11