IPL 2023 : यंदाच्या आयपीएलमध्ये षटकारांचा पाऊस, सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप-5 फलंदाजांची यादी पाहा
आयपीएल 2023 मध्ये, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपची शर्यत रंगतदार झाली आहे. दिग्गज खेळाडूंसह युवा खेळाडूही या शर्यतीत पुढे आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाच्या मोसमात खेळाडूंकडून षटकांचा वर्षाव पाहायला मिळाला आहे. जास्तीत जास्त षटकार ठोकण्याच्या स्पर्धेत टॉप-5 खेळाडूंची यादी पाहा.
image 6आयपीएल 2023 मध्ये टॉप-5 सिक्सर किंगच्या यादीत फाफ डु प्लेसिस याच्यासह रिंकू सिंह आणि यशस्वी जयस्वालही आहेत.
आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आतापर्यंतच्या 12 सामन्यांत 34 षटकार ठोकले असून तो या यादीत अव्वल स्थानावर आहे.
आरसीबीचा दुसरा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा याचाही या यादीत समावेश आहे. मॅक्सवेलने यंदाच्या हंगामात 30 षटकार ठोकले आहेत.
चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू शिवम दुबेची बॅटही या हंगामात जबरदस्त चालली असून त्याने आतापर्यंतच्या सामन्यात 30 षटकार ठोकले आहेत.
युवा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वालने आयपीएल 2023 मध्ये 13 सामन्यात एकूण 26 षटकार ठोकले आहेत.
यशस्वी जयस्वालने दमदार कामगिरी करत यंदाचा हंगाम गाजवला आहे. त्याची टी इंडियामध्ये वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर केकेआरचा संकटमोचक आहे.
या हंगामात केकेआरला एकापेक्षा जास्त वेळा संकटातून बाहेर काढणाऱ्या रिंकू सिंहने आयपीएल 2023 मध्ये 25 षटकार ठोकले आहेत. गुजराज विरोधातील सामन्यात त्याने शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.