Mohit Sharma in IPL : तब्बल तीन वर्षानंतर दमदार पुनरागमन, मोहित शर्माची आयपीएलमध्ये 'शंभर नंबरी' कामगिरी
मोहित शर्माने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 100 विकेट घेतल्या आहेत. 02 मे रोजी पार पडलेल्या गुजरात विरुद्ध दिल्ली (GT vs DC) सामन्यात त्याने हा विक्रम स्वत:च्या नावे केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएल 2023 च्या 44 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एक विक्रम नोंदवला आहे.
मोहित शर्माने रिपल पटेलला बाद करत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 100 बळी पूर्ण केले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मोहित शर्माने अप्रतिम गोलंदाजी केली. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाज असणाऱ्या मोहितने चार षटकांत 33 धावा देत दोन बळी घेतले.
त्याने पहिल्यांदा अक्षर पटेलला लाँग ऑफवर राशिद खानकरवी झेलबाद केलं. यानंतर मोहित शर्माने रिपल पटेलला कर्णधार हार्दिक पांड्याकडून झेलबाद करून आयपीएलमधील 100 वा गडी बाद केला.
मोहित शर्माने तब्ब्ल तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. याआधी मोहित आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासाठी शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर यंदाच्या मोसमात त्यानं तब्बल तीन वर्षानंतर मोहितनं आयपीएलमध्ये दमदार पदार्पण केलं आहे.
आयपीएलमध्ये विकेट्सचं शतक पूर्ण करणारा मोहित शर्मा हा 23 वा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंतच्या 92 सामन्यांत 25.95 च्या सरासरीने आणि 8.36 च्या इकॉनॉमी रेटने 100 गडी बाद केले आहेत.
14 धावांत 4 गडी बाद करणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
सध्याच्या आयपीएल (IPL 2023) हंगामात मोहितच्या दमदार गोलंदाजीने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
आयपीएल 2023 मध्ये, त्याने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये 15.63 च्या सरासरीने आणि 6.94 च्या इकॉनॉमी रेटने 8 विकेट घेतल्या आहेत.