PHOTO : तळकोकणातील मालवण समुद्रकिनाऱ्यावर नौकानयन स्पर्धा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मच्छीमार बांधव एकत्रित येत गाबित महोत्सवाचे मालवणमधील दांडी समुद्रकिनारी आयोजन केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया महोत्सवात नौकानयन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 14 संघांनी सहभाग दर्शवला होता.
प्राथमिक तीन आणि अंतिम एक अशा चार गटात ही स्पर्धा पार पडली.
श्री देव दांडेश्वर मंदिर ते श्री देव चौकचार श्रीकृष्ण मंदिरपर्यंतचे सागरी अंतर स्पर्धकांना पार करावे लागले.
स्पर्धेत अव्वल येण्यासाठी स्पर्धकांनी आपले वल्हवण्याचे कौशल्य आणि पूर्ण ताकद पणाला लावली.
स्पर्धेत सरस होण्यासाठी समुद्रात सुरु असलेली चुरस अतिशय रंगतदार ठरली.
पर्यटकांनीही नौकानयन स्पर्धेचा आनंद लुटला. मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेस उपस्थिती दर्शवून नौकानयन कौशल्याचे कौतुक केले.
वायरी जाधववाडी येथील मंदार घारे यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
झालझुलवाडीतील संजय गावकर संघाने द्वितीय तर देवबागमधील पंकज मालंडकर यांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.