MI vs RR, Match Highlights : आयपीएलचा 1000 वा सामना ठरला खास! यशस्वीचं पहिलं शतक, टीम डेव्हिडचे सलग तीन षटकार
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) चा 1000 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात खेळला गेला. अतिशय रोमांचक झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा शेवटच्या षटकात 6 गडी राखून पराभव केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील हा 1000 वा सामना होता. आयपीएल टी20 लीग 2008 पासून खेळवली जात आहे. या लीगमुळे अनेक खेळाडूंना टीम इंडियासाठी खेळण्यासाठी दारंही उघडली आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर रविवारी (20 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील चौथ्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग मुंबई संघाने केला.
मुंबई विरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या 21 वर्षीय यशस्वी जैस्वालनं शानदार शतकी खेळी केली. यशस्वीने आयपीएल कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. त्यानं पहिल्या चेंडूपासूनच स्फोटक फलंदाजी केली.
यशस्वीने 62 चेंडून 124 धावांची खेळी करत त्याच्या बॅटची ताकद दाखवून दिली. यासोबतच यशस्वीने यंदाच्या आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्याही नोंदवली आहे. कधीकाळी मुंबईमध्ये पाणीपुरी विकणाऱ्या या खेळाडूच्या मेहनत आणि जिद्दीचं सर्वत्र कौतुक होतं आहे.
मुंबई संघाकडून सुर्यकुमार यादव दमदार फलंदाजी करताना दिसत होता. मात्र, मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात सुर्या झेलबाद झाला.
राजस्थान रॉयल्सच्या संदीप शर्मानं सुर्यकुमार यादवला शानदार डायव्हिंग झेल घेत, त्याला तंबूत माघारी धाडलं. त्यानं झेल घेण्यासाठी 19 मीटर अंतर उलट दिशेने धावत जात डॅशिंग झेल घेतला.
सुर्यकुमार यादवचा झेल घेणाऱ्या संदीप शर्माचं सर्वत्र कौतुक होतं आहे. या दमदार कॅचचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोळाव्या षटकात सुर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या टीम डेव्हिडने शानदार फलंदाजी करत मोठे फटके मारले. राजस्थानच्या जेसन होल्डरने 3 फुल टॉस चेंडू टाकले, यावर डेव्हिडने सलग तिन्ही षटकार मारून संघाला तीन चेंडू राखून सहा विकेटने विजय मिळवून दिला.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने याला त्याच्या वाढदिवसा दिवशी (30 एप्रिल) बोल्ड करत केवळ तीन धावांवर तंबूत परतावं लागलं.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला त्याच्या वाढदिवशी काही विशेष कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावातील दुसऱ्याच षटकात राजस्थानच्या संदीप शर्माने त्याला स्लोअर चेंडूवर बोल्ड केलं. रोहितला फक्त तीन धावा करता आल्या.