IPL 2022, MI vs LSG : मुंबईच्या पराभवातील महत्त्वाच्या गोष्टी, हे आहेत 10 महत्त्वाचे मुद्दे

मुंबई विरुद्ध लखनौ सामन्यात मुंबईला सहावा सलग पराभव पत्करावा लागला. या पराभवाचं एक मोठं कारण म्हणजे केएल राहुलचं दमदार शतक.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
केएल राहुलच्या शतकासह आणखीही काही गोष्टी कारणीभूत ठरल्या मुंबईच्या या पराभवामागे

राहुलने 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 103 धावा केल्या.
सामन्यात राहुलने डि कॉकसह चांगली सुरुवात केली. पण डि कॉक बाद होताच संघावर प्रेशर आलं. पण याचवेळी राहुलसोबत मयांकने एक उत्तम भागिदारी रचली. ही भागिदारी संघासाठी महत्त्वाची ठरली.
मुंबईकडून गोलंदाजीत खास कामगिरी झाली नसून आज एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेली मिसफिल्ड.मुंबईचे गोलंदाज खराब कामगिरी करतच होते. त्यात मुंबईने मोठ्या विश्वासाने संघात घेतलेल्या इंग्लंडच्या टायमल मिल्सच्या गोलंदाजीवर आज तुफान फटकेबाजी झाली. त्याला तीन षटकात 54 धावा आल्या. केवळ बुमरहाने 24 चेंडूत 24 धावा देत दिल्या. विकेट्सचा विचार करता उनडकटने दोन, मुरगन आणि फेबियन एलनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्यानंतर दुसऱ्या इनिंगचा विचार करता, 200 धावांचे आव्हान पार करताना मुंबईचे सलामीवीर आजही फेल झाले. रोहित सहा तर ईशान 13 धावाच करु शकला.
संघ अडचणीत असताना तिलक आणि सूर्यकुमारने एक चांगली भागिदारी रचली. पण ते संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीत. तिलक 26 आणि त्यानंतर सूर्यकुमार 37 धावा करुन तंबूत परतला
अखेरच्या काही षटकात पोलार्डने विजय मिळवून देण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले. पण त्याची 25 धावांची खेळी मुंबईला विजय मिळवून देऊ शकली नाही.
सामन्यात मुंबईची फलंदाजी तर सुमार पाहायला मिळालीच, पण गोलंदाजीमधील अडचणी पुन्हा दिसून आल्या. बुमराहच्या जोडीला एकही चांगल्या फॉर्ममधील गोलंदाज नसल्याने आज मुंबई पराभूत झाली असे म्हणता येईल.
या विजयासह लखनौने स्पर्धेत चौथा विजय मिळवला आहे. त्यांनी केवळ दोन सामने गमावले आहेत.