Rajat Patidar : बंगळुरुच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रजतला म्हणतात 'हनुमान', काय आहे कारण?
आयपीएल 2022 (Ipl 2022) स्पर्धेच्या एलिमेनेटर सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरुने लखनौ संघाला मात देत क्वॉलीफायर 2 मध्ये झेप घेतली आहे. सामन्यात बंगळुरु संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो फलंदाज रजत पाटीदार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App112 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या रजतला आधी त्याच्या संघातील खेळाडू हनुमान म्हणतात, हनुमान म्हणण्यामागेही एक खास कारण आहे.
रजत मध्य प्रदेशसाठी स्थानिक क्रिकेट खेळतो. त्याने 2015 साली डेब्यू केला होता. त्याच्याबद्दल बोलताना एकदा गोलंदाज ईश्वर पांडे (Ishwar Pandey) यांनी त्याला हनुमान म्हटलं होतं.
रजत संघासाठी हनुमानासारखा आहे. कायम संकटात संघाची मदत करण्यासाठी येत असतो. त्याने अनेक अशा दमदार खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे रजतला हनुमान हे नाव पडलं.
विशेष म्हणजे महत्त्वाच्या सामन्यात रजत आरसीबीसाठीही हनुमानच ठरला आहे.
रजतने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात एक गोलंदाज म्हणून केली होती. पण 2014 साली फुटबॉल खेळताना त्याला दुखापत झाली, ज्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.
ज्यामुळे आठ महिने तो क्रिकेटपासून दूर होता. त्यावेळी अनेकांनी त्याला अनेक सल्ले दिले. पण त्याने त्याच्या फलंदाजीवर बराच परिश्रम घेतला. भारताचे माजी फलंदाज अमय खुरासिया यांनी त्याची ट्रेनिंग घेतली. ज्यानंतर तो एक फलंदाज म्हणून समोर आला.
यंदाच्या हंगामात रजतने आरसीबी संघासाठी काही महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या असून क्वॉलीफायरमध्येही त्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत.
बंगळुरु संघाने 207 धावा करत लखनौला 208 धावांचे आव्हान दिले. जे लखनौ पूर्ण न करु शकल्याने बंगळुरु जिंकली.
फलंदाजीच रजतने तर गोलंदाजीच जोस हेझलवुडने कमाल कामगिरी केली.