IPL 2023 : अपघातात पायांना मोठी दुखापत, चालणंही होतं अवघड, तोच ठरलाय IPLचा 'मॅच विनर'
वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन सध्या आयपीएल 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 19 चेंडूत 326.32 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना पुरनने 62 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून संघाच्या विजयाचा हिरो ठरला. या खेळीत 4 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.
आयपीएल 2023 मध्ये चमकणारा निकोलस पुरन जानेवारी 2015 मध्ये एका भीषण कार अपघाताचा बळी ठरला होता. या अपघातात पुरणचे दोन्ही पाय जवळपास निकामी झाले होते.
या भीषण अपघातावेळी त्याचं वय फक्त 19 वर्षे होतं आणि त्यावेळी तो त्याच्या क्रिकेटमधील करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता.
या दुर्घटनेत पुरनचा पेटेलर टेंडन फाटला होता उजव्या पायाचा घोटा फ्रॅक्चर झाला होता.
अपघात इतका गंभीर होता की शस्त्रक्रियेपूर्वी पूरन पुन्हा क्रिकेट खेळू शकेल की नाही याबाबत डॉक्टरही साशंक होते.
अपघातानंतर पूरनने अनेक महिने व्हील चेअरवर घालवले. पण, काही काळानंतर पुरनने स्वत:ला अपघातातून सावरलं. त्यानंतर त्याने दमदार पुनरागमन केलं.
आयपीएल (IPL) 2023 मध्ये निकोलस पुरन लखनौ सुपर जायंट्ससाठी खेळत आहे.
लखनौ संघाने आयपीएल मिनी लिलावात निकोलस पुरनला 16 कोटींच्या मोठ्या किमतीत पुरनला खरेदी केलं. चौथ्या सामन्यातच त्याने शानदार खेळी करून संघाचा विश्वास सार्थ ठरवला.
दुसरीकडे, पुरनच्या वेस्ट इंडिज संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. निकोलस पुरनने आतापर्यंतच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 54 एकदिवसीय आणि 75 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.