IPL 2023 : दोन 'किंग' एकाच फ्रेममध्ये! शाहरुखची मैदानातच विराटला 'जादू की झप्पी'; Photo व्हायरल
कोलकाताने (KKR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) 81 धावांनी दारुण पराभव केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी संघाचा मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) संघाला प्रोत्साहन देताना पाहायला मिळाला.
दरम्यान, सामना संपल्यानंतर शाहरुख खान आणि विराट कोहली यांनी एकमेकांची भेट घेतली. यावेळी शाहरुख खानने कोहलीला मिठी मारली हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
यावेळी शाहरुख खानने विराट कोहलीला कडकडून मिठी मारली एवढंच नाही तर त्याचा गालही ओढला. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असून व्हायरल होत आहेत.
सामना संपल्यानंतर शाहरुख खानने कोहलीला मिठी मारली हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानंतर शाहरुख खानने विराट कोहलीची भेट घेतली. यानंतर दोघेही पठाण चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसले.
सामना झाल्यानंतर 'किंग खान' शाहरुखने (Shah Rukh Khan) दोन्ही संघाच्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी शाहरुख खानने विराट कोहलीचीही (Virat Kolhi) भेट घेतली.
शाहरुखने 'किंग' कोहलीची भेट घेत प्रेमाने गालही ओढला. इतकंच नाही तर या भेटीनंतर दोन्ही 'किंग' शाहरुखच्या पठाण चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसले.
व्हायरल व्हिडीओमध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर किंग कोहली आणि किंग खान शाहरुख खान एकत्र डान्स करताना दिसत आहेत.
आयपीएलमध्ये गुरुवारी केकेआरने आरसीबीचा 81 धावांनी दारुण पराभव केला. यावेळी संघाचा मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) संघाला प्रोत्साहन देताना पाहायला मिळाला.
केकेआरने आरसीबीचा पराभव करून गुणतालिकेत खातं उघडलं. 205 धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ केवळ 123 धावांवर बाद झाला.
गोलंदाज सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांनी आरसीबीच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. शार्दुल ठाकूरच्या झंझावाती अर्धशतकामुळे पहिल्या डावात केकेआरने 20 षटकांत सात गडी गमावून 204 धावा केल्या.