कोलकात्याच्या प्लेऑफच्या आशा जिवंत, हैदराबादचा 54 धावांनी पराभव
आंद्रे रसेलच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर कोलकात्याने हैदराबादचा 54 धावांनी पराभव केला. कोलकात्याने दिलेल्या 178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 20 षटकांत आठ बाद 123 धावांपर्यंत मजल मारु शकला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोलकात्याने दिलेलेल्या 178 धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. कर्णधार केन विल्यमसन अवघ्या 9 धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर राहुल त्रिपाठीही 9 धावा काढून बाद झाला.
एका बाजूला विकेट पडत असताना युवा अभिषेक शर्माने विस्फोटक फलंदाजी केली. अभिषेक शर्मा आणि एडन मार्करम यांनी हैदराबादचा डाव सावरला. अभिषेक शर्माने 28 चेंडूत 43 धावा केल्या.
निकोलस पूरन दोन धावांवर बाद झाला.. एडन मार्कमचा अडथळा उमेश यादवने दूर करत सामन्यावर वर्चस्व निर्माण केले. त्यानंतर वॉशिंगटन सुंदर 1, शशांक सिंह 11, मार्को जेनसेन 1 धावांवर बाद झाले.. भुवनेश्वर कुमार 6 आणि उमरान मलिक 3 धावांवर नाबाद राहिले.
कोलकात्याकडून आंद्रे रसेलने भेदक मारा केला. रसेलने चार षटकांत 22 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या रसेलने केन विल्यमसन, वॉशिंगट सुंदर आणि मार्के जेनसेन यांना तंबूत धाडले.. टीम साऊदीनेही अचूक टप्यावर गोलंदाजी केली. साऊदीने दोन विकेट घेतल्या. तर उमेश यादव, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
अभिषेक शर्माचा आणि मार्करमचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मैदानावर स्थिरावाता आले नाही.
अजिंक्य रहाणे आणि नीतीश राणा यांनी कोलकात्याचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आले. अजिंक्य रहाणे 28 तर नीतीश राणा 26 धावा काढून बाद झाले. कर्णधार श्रेयस अय्यर 15 धावा काढून बाद झाला... रिंकू सिंह 5 धावा काढून बाद झाला..
पाच विकेट झटपट पडल्यानंतर सॅम बिलिंग्स आणि आंद्रे रसेल यांनी कोलकात्याचा डाव सावरला. सॅम बिलिंग्सने 34 धावांची खेळी केली. आंद्रे रसेल आणि शॅम बिलिंग्स यांनी 44 चेंडूत 63 धावांची भागिदारी केली. कोलकात्याकडून ही सर्वात मोठी भागिदारी होय.
सॅम बिलिंग्स बाद झाल्यानंतर आंद्रे रसेल याने सामन्याची सर्व सुत्रे आपल्याकडे घेतली. रसेलने अखेरच्या षटकांत धावांचा पाऊस पाडला. रसेलने सुंदरच्या अखेरच्या षटकात तीन षटकार मारत कोलकात्याची धावसंख्या 170 च्या पार नेली. आंद्रे रसेलने 28 चेंडूत 49 धावांची खेळी केली.
कोलकात्याचा 13 सामन्यातील हा सहावा विजय होता. यासह कोलकाता गुणतालिकेत 12 गुणांसह सहाव्या क्रमांकावर पोहचलाय. या विजयासह कोलकात्याने प्लेऑफचे आव्हान जिवंत ठेवलेय. हैदराबादचा 12 सामन्यातील सातवा पराभव होता. हैदराबादचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे.