In Pics : आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरल सॅम करन, 18.50 कोटींना पंजाबमध्ये सामिल
इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी कोची येथील लिलावात रेकॉर्डब्रेक बोली लागली आणि सॅम करन सर्वात महागडा विकला गेला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआधी चेन्नईच्या संघात असणारा सॅम आता पंजाब किंग्समध्ये खेळणार असून त्याच्यासाठी पंजाबने बरेच पैसे मोजले आहेत.
पंजाबने तब्बल 18.50 कोटी रुपयांना सॅमला संघात सामिल केलं आहे.
सध्या सॅम करन कमाल फॉर्मात दिसत आहे. टी20 मध्ये तर अगदी दमदार कामगिरी करत आहे.
टी20 विश्वचषक 2022 चा 'प्लेअर ऑफ द सीरीज' ठरलेला इंग्लंडचा सॅम करन याच्यावर यंदा अनेक फ्रँचायझीची नजर होती.
तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि क्रिकेटमध्ये डाव्या हाताच्या गोलंदाजांना मोठी मागणी असते. यासोबत तो खालच्या ऑर्डरमध्येही चांगली फलंदाजी करू शकतो. हेच कारण होते की बरेच संघ त्याच्यावर बराच पैसा ओतणार होते.
तसंच झालं आणि त्याचा जुना संघ चैन्नई आणि पंजाब यांच्यात त्याला विकत घेण्यासाठी चुरशीची लढाई झाली जी पंजाब किंग्जने जिंकत 18.50 कोटींना सॅमला संघात घेतलं.
याशिवाय कॅमरॉन ग्रीन आणि बेन स्टोक्स यांनाही तगडी किंमत मिळाली आहे. आहे. ग्रीनला 17.50 कोटींना मुंबई इंडियन्सने तर बेन स्टोक्सला 16.25 कोटींना सीएसकेनं विकत घेतलं आहे.
याआधी आयपीएलच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू ख्रिस मॉरिस (Chri Morris) सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. राजस्थान रॉयल्सने त्याला 2021 मध्ये 16.25 कोटींना खरेदी केले होते.
आता नव्याने सामिल सॅममुळे पंजाब आपला पहिला-वहिला चषक जिंकणार का? हे पाहावे लागेल.