श्रेयस अय्यरचं IPL मधील मानधन 7 वर्षात 10 पट वाढलं, पंजाब किंग्जनं इतिहास रचला, आयपीएलमधील दुसरा महाग खेळाडू ठरला
Shreyas Iyer IPL 2025 Price : श्रेयस अय्यरनं 2015 च्या आयपीएलमध्ये पहिली मॅच दिल्ली डेअर डेविल्सकडून खेळली होती. त्यानंतर 9 वर्षानंतर आयपीएलच्या इतिहासातील दुसरा महाग खेळाडू ठरला आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर 26.75 कोटी रुपयांची बोली पंजाब किंग्जनं लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या सात वर्षात आयपीएलमधील श्रेयस अय्यरचं मानधन 10 पट वाढलं आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून 2015-2017 या काळात खेळत होता तेव्हा त्याला 2.60 कोटी रुपये मिळाले होते.
2018 च्या मेगा ऑक्शनमध्ये श्रेयस अय्यरला दिल्ली कॅपिटल्सनं 7 कोटी रुपये देत खरेदी केलं होतं. त्याच्या नेतृत्त्वात दिल्लीनं 2020 मध्ये आयपीएल फायनलमध्ये धडक दिली होती होती.
आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये श्रेयस अय्यरला केकेआरनं 12.25 कोटी रुपये देऊन खरेदी केली. 2022,2023 च्या आयपीएलमध्ये तो चांगली कामगिरी करु शकला नाही. मात्र, 2024 चं आयपीएल केकेआरला मिळवून देण्यात च्याची महत्त्वाची भूमिका होती.
श्रेयस अय्यरला खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स पुन्हा एकदा इच्छुक होतं. दिल्लीनं श्रेयससाठी 26.50 कोटींपर्यंत बोली लावली होती. अखेर पंजाबनं 26.75 कोटी रुपये मोजत श्रेयस अय्यरला संघात घेतलं. 2017 च्या तुलनेत श्रेयस अय्यरला 10 पट पगार 2025 च्या आयपीएल साठी मिळणार आहे.