IPL 2022 : दिल्लीवर विजय मिळवत लखनौ संघाची झेप, काय आहेत सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे?
दिल्ली कॅपिटल्सने अखेर पर्यंत झुंज देऊनही लखनौ सुपरजायंट्सने (MI vs LSG) 6 धावांनी विजय मिळवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअत्यंत चुरशीच्या सामन्यात दोन्ही संघाली चांगली कामगिरी केली खरी पण दिल्ली थोडक्यात पराभूत झाली असून सामन्यातील काही महत्त्वाचे मु्द्दे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे. आजही लखनौने नाणेफेक जिंकली, विशेष म्हणजे लखनौने प्रथम फलंदाजीसारखा निर्णय घेऊनही त्यांचाच विजय झाला आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आजही केएल राहुल चमकला. राहुलने 51 चेंडूत 77 धावांची दमदार खेळी केली. त्याला दीपक हुडाने 52 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली.
राहुल-दीपक बाद झाल्यानंतर अखेर मार्कस स्टॉयनिस (नाबाद 17) आणि कृणालने (नाबाद 9) धावा करत संघाचा स्कोर 195 धावांपर्यंत नेला.
दिल्लीकडून एकाही गोलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. अक्षरने चांगली गोलंदाजी केली पण तो विकेट घेऊ शकला नाही. तर तीन विकेट्स घेणारा शार्दूल मात्र 40 धावा देऊन गेला.
196 धावांचे एक मोठे आव्हान दिल्लीसमोर असल्याने त्यांच्यावर आधीच दबाव होता. त्यामुळे त्यांची सुरुवात खराब झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर 13 धावांवर बाद झाले.
त्यानंतर मिचेल मार्श आणि ऋषभ पंतने एक मोठी भागिदारी रचली. जी संघासाठी महत्त्वाची ठरत होती. पण तेव्हाच मार्श 37 धावांवर बाद झाला.
कर्णधार पंत एकहाती झुंज देत होता, ज्यामुळे दिल्ली जिंकेल असे वाटत होते. पण पंतही 44 धावा करुन तंबूत परतला. ज्यामुळे संघाची अडचण वाढली.
अखेर अष्टैपूल रोवमेन पोवेलने धडाकेबाज कामगिरी सुरु केली. पण 35 धावा करुन तो बाद झाला आणि दिल्लीचा विजय फारच अवघड झाला.
सामन्यात दिल्लीचं आव्हान संपत आहे असं वाटताना अक्षर आणि कुलदीपने एक उत्तम झुंज दिली. दोघांनी काही षटकारही खेचले ज्यामुळे अखेरच्या षटकापर्यंत खेळ गेला.
अखेरच्या षटकात स्टॉयनिसने मात्र 21 धावा डिफेन्ड केल्या, ज्यामुळे लखनौचा संघ सहा धावांनी जिंकला.