Health Tips : बहुगुणी फणसाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
फणसातील अँटीऑक्सिडंट्समुळे कँसर, हृदयविकार, टाइप-2 मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या होण्यापासून रक्षण होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफणसामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने ज्यांना कॉन्स्टिपॅशनचा किंवा पोट साफ न होण्याचा त्रास आहे त्यांनी फणसाची भाजी किंवा फणसाचे गरे आवर्जून खावेत.
अल्सरचा त्रास असलेल्या रुग्णांनी फणस जरूर खा. यात असणाऱ्या नैसर्गिक घटकांमुळे जठरातील अल्सरच्या जखमा भरून येण्यास मदत होते.
ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी फणस खाणे उपयुक्त आहे. कारण फणसात असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.
फणसातील फायबर्स, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो.
हिमोग्लोबिन कमी असलेल्यानी फणस जरूर खावा. कारण फणसात लोहाचे भरपूर प्रमाण असते. यामुळे अशक्तपणा आणि थकवा दूर होण्यास मदत होते.
फणसामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाणही मुबलक असते. त्यामुळे फणस खाणे हे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते.
फणसात प्रोटीन्ससुद्धा भरपूर असते. त्यामुळे शारीरिक दुर्बलता कमी होऊन मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.