Shreyas Iyer : केकेआरनं श्रेयस अय्यरला रिटेन का केलं नाही? कोलकाता नाईट रायडर्सच्या CEO नं नेमकं काय म्हटलं?
आयपीएल 2025 साठी केकेआरनं रिटेन केलेल्या खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण केकेआरनं टीमला आयपीएल ट्रॉफी मिळवून देणार्या श्रेयस अय्यरला रिटेन करण्यात आलं नव्हतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेकेआरचे सीईओ वैंकी मैसूर यांनी रेव स्पोर्ट्ससोबत बोलताना याबाबत माहिती दिली आहे. अय्यरला रिलीज करण्यामागं अनेक कारणं होती. ते म्हणाले कोणत्याही खेळाडूचं योग्य मूल्य ऑक्शनमध्ये समोर येतं.
वैंकी मैसूर यांच्या वक्तव्यातून श्रेयस अय्यरला आर्थिक कारणामुळं रिलीज करण्यात आल्याचे संकेत मिळतात.
काही मीडिया रिपोर्टसच्या दाव्यानुसार श्रेयस अय्यरनं रिटेन्शनसाठी केकेआरकडे मोठी रक्कम मागिल्याचं बोललं जातं.
वैंकी मैसूर यांनी श्रेयस अय्यरचं नाव रिटेन्शन लिस्टमध्ये पहिलं होतं मात्र काही कारणांमुळं त्याला संघासोबत ठेवता आलं नाही, असं म्हटलं.
वैंकी मैसूर म्हणाले श्रेयस अय्यर रिटेन्शन लिस्टमध्ये पहिल्या स्थानी होता कारण तो कॅप्टन होता.श्रेयसनं आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआरकडून आयपीएलमध्ये क्रिकेट खेळलं आहे.