Jos Buttler's Love Story : बालपणीच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर, अशी आहे जोस बटलरची प्रेमकहाणी

जोस बटलरच्या पत्नीचं नाव लुईस आहे. लुईस आणि जोस लहानपणापासूनच खूप जवळचे मित्र आहेत. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजोस बटलर आणि लुईसची प्रेमकहाणी शाळेपासून सुरू झाली. दोघेही वयाच्या 14 व्या वर्षापासून खूप चांगले मित्र होते.
जोस बटलर आणि लुईस यांचीमैत्री इतकी घट्ट होती की, तेव्हापासून जोस लुईसला 'बायको' म्हणायचा.
जोस आणि लुईस यांच्या मैत्री रुपांतर नंतर प्रेमात झालं. दोघांनीही त्यांच्या प्रेमाच्या नात्याला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीला ते एकमेकांना जास्त वेळ देऊ शकले नाहीत. कारण दोघांनीही आपापल्या करिअरला प्राधान्य देण्याचं ठरवलं होतं.
एकीकडे लुईसने आपली करिअर घडवलं आणि दुसरीकडे बटलरने इंग्लंड क्रिकेट संघात आपलं स्थान पक्कं केलं, त्यानंतर दोघांनी एकमेकांना अधिक वेळ देण्यास सुरुवात केली.
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर जोस बटलरने 21 ऑक्टोबर 2017 रोजी लुईसशी लग्न केलं.
एप्रिल 2019 मध्ये जोस आणि लुईस या जोडप्याला पहिली मुलगी झाली. तर दुसऱ्या मुलीचा जन्म सप्टेंबर 2021 मध्ये झाला.
जोस आणि लुईस यांच्यात उत्तम केमिस्ट्री आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात.
जोस बटलरची पत्नी लुईस बटलर एक व्यावसायिक पिलेट्स ट्रेनर आहे.
अगदी लहान वयातच तिने करिअरला सुरुवात केली. Pilates हा एक प्रकारचा व्यायाम आहे.