MI vs GT : आयपीएलचा अंतिम सामना 'एल-क्लासिको'? गुजरातला हरवल्यास मुंबई CSK सह अंतिम फेरीत

IPL 2023 Qualifier 2, GT vs MI : इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात रंगणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आयपीएल 2023 मध्ये आजच्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळाल्यास मुंबई संघाला अंतिम फेरीत एन्ट्री मिळेल. यामुळे आयपीएल 2023 चा अंतिम सामना मुंबई विरुद्ध चेन्नई अशी 'एल-क्लासिको' लढत पाहायला मिळेल.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांचा सामना सर्वात रोमांचक मानला जातो. चेन्नई संघाला यंदा मुंबई संघासोबत पाच वेळा आयपीएल विजेते होण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.
आयपीएल 2023 च्या पहिला क्वालिफायर सामना जिंकून चेन्नई सुपर किंग्स संघाने थेट अंतिम फेरीत धडक मारली.
प्लेऑफमधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सला पराभव केला आणि फायनलचं तिकीट मिळवलं.
चेन्नई विरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतरही गुजरात संघाला आज दुसरा क्वालिफायर सामना खेळण्याची संधी मिळेल. अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघ मैदानात उतरेल.
या सामन्यात मुंबईनं गुजरातचा पराभव केल्यास मुंबई इंडियन्स अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल आणि असे झाल्यास आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमने-सामने येतील.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) या दोन संघामधील सामन्याला एल-क्लासिको असं म्हटलं जातं. या दोन संघांच्या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींच लक्ष लागलेलं असतं.
मुंबई आणि चेन्नई दोन्ही संघ सर्वाधिक वेळा आयपीएल विजेते आहेत. तसेच, दोन्ही संघांचा चाहतावर्ग देखील फार मोठा आहे.
एल-क्लासिको (El Clásico) हा स्पॅनिश शब्द असून याचा अर्थ उत्कृष्ट असा आहे. दोन उत्कृष्ट संघांमधील लढत म्हणजेच दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांतील सामन्याला 'एल क्लासिको' म्हटलं जातं.
फुटबॉलमध्ये बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यातील सामन्याला 'एल क्लासिको' म्हणलं जातं, कारण दोन्ही संघ लीगमधील सर्वात यशस्वी क्लब आहेत.
त्याचप्रमाणे, इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्याला एल क्लासिको असं म्हटलं जातं. कारण, मुंबई इंडियन्स संघ सर्वाधिक 5 वेळा आयपीएल विजेता आहे. तर, चेन्नई संघही 4 वेळा आयपीएल विजेता ठरला आहे.