IPL 2024 Sunrisers Hyderabad: हैदराबादचा संघ अंतिम सामन्यात पोहचताच पुन्हा तिची रंगली चर्चा; कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल?'
आयपीएल 2024 मधील क्वालिफायर 2 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) राजस्थान रॉयल्सचा (RR) 36 धावांनी पराभव केला. (image credit-social media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया विजयासह हैदराबादने अंतिम सामन्यात प्रवेश केला. आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. (image credit-social media)
सनरायझर्स हैदराबादचा सामना असला की संघाची मालकीण काव्या मारनचे रिअॅक्शन, फोटो, व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. (image credit-social media)
काव्या मारनची चर्चा होत असताना डेक्कन चार्जस या संघाच्या मालकीणची देखील आता चर्चा रंगू लागली आहे. (image credit-social media)
21 सप्टेंबर 1996 मध्ये जन्मलेल्या गायत्री रेड्डीला डेक्कन चार्जर्सची मालकीण म्हणून ओळख मिळाली. डेक्कन क्रोनिकलचे मालक टी वेंकटराम रेड्डी यांची ती कन्या आहे. (image credit-social media)
आयपीएल 2008 मध्ये गायत्रीने डेक्कन चार्जर्स संघाची बांधणी करण्यात वडिलांना मदत केली. तिने खेळाडूंची निवड केली आणि सातत्याने ती संघासोबत असायची. (image credit-social media)
आयपीएलच्या अनेक सामन्यांमध्ये ती स्टँडमध्ये दिसली होती. चाहत्यांना वाटायचे की ती दक्षिण भारतीय अभिनेत्री असावी. तिने खेळाडूंच्या लिलावातही भाग घेतला होता.(image credit-social media)
हैदराबाद फ्रँचायझी ही डेक्कन चार्जर्स म्हणून आयपीएलमध्ये खेळली. (image credit-social media)
2009मध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अॅडम गिलख्रिस्ट याच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. (image credit-social media)