IPL : आयपीएलमधील स्टम्प अन् बेल्स कितीला मिळतात? युवा खेळाडूंना पूर्ण आयपीएल खेळूनही तितके पैसे मिळत नाहीत..
आयपीएलमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टम्प आणि बेल्सविषयी अनेकांना माहिती नसते. इलेक्ट्रिक स्टम्प आणि बेल्सची किंमत इतकी जास्त असते काही खेळाडूंना देखील तितकी रक्कम पूर्ण आयपीएल खेळून मिळत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमीडिया रिपोर्टसनुसार आयपीएलच्या 14 व्या हंगामात वापरण्यात आलेल्या स्टम्प आणि बेल्सची किंमत 40 लाख रुपये होती.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये एखाद्या टीमची फी देखील जितकी नसते तितकी किंमत या स्टम्प आणि बेल्सची असते. टी-20 वर्ल्डकपमध्ये मॅच फी 30 लाख रुपये असते.
2013 मध्ये बिग बॅश लीगच्या दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या ब्रॉन्टे एकरमॅननं याची संकल्पना मांडली होती. त्यानंतर इलेक्ट्रिक स्टम्प आणि बेल्सची निर्मिती झाली.
बांगलादेशमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इलेक्ट्रिक स्टम्प आणि बेल्सचा वापर करण्यात आला होता. इलेक्ट्रिक बेल्सचा फायदा म्हणजे याती एलईडी लाईटसह इ बिल्ट सेन्सर देखील असतात.त्याचा फायदा क्रीझवरील आवाज रेकॉर्ड करण्यात होतो.