'धडक 2' ते 'भूल भुलैया 3'... 'ॲनिमल' नंतर नॅशनल क्रश तृप्ती दिमरीला मिळाले हे मोठे चित्रपट!
रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या सिनेमात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत होती. चर्चा मात्र, अभिनेत्री तृत्पी डिमरी (Tripti Dimri) हिची झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड असो किंवा सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी भाभी 2 म्हणजेच तृत्पी डिमरीच्याच चर्चा आहेत. अॅनिमलमधील केवळ 10 मिनीटांची भूमिका असतानाही तृत्पी डिमरी रश्मिकापेक्षा जास्त भाव खाऊन गेली होती.
त्यानंतर तिला नॅशनल क्रशचे टॅग देखील लावण्यात आले होते. चाहत्यांकडून अजूनही तृप्तीचे कौतुक होतच आहे.
तिच्या सौदर्यांचे चाहते भरभरुन कौतुक करताना दिसतात.
अॅनिमल हा सिनेमा सक्सेसफुल ठरल्यानंतर तृप्तीला अनेक सिनेमांच्या ऑफर येत आहेत.
बॉलिवूडनंतर तिला साऊथ सिनेमांच्या ऑफर येत आहेत.
तृत्पी तेलगू सिनेमांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची म्हटले जात आहे.
अलीकडेच करण जोहरने तृप्ती डिमरीच्या आगामी चित्रपट 'धडक 2' चा टीझर रिलीज करून एक मोठे अपडेट त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सिद्धांत-तृप्तीचा हा चित्रपट जान्हवी कपूर आणि ईशान .ट्टरचा 2018 साली रिलीज झालेल्या 'धडक' या डेब्यू चित्रपटाचा सीक्वल आहे,
याशिवाय, तृप्ती दिमरी लवकरच कार्तिक आर्यन आणि विद्या बालनचा बहुप्रतिक्षित आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3' मध्ये दिसणार आहे, जो यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होऊ शकतो.
यापूर्वी कियारा अडवाणी 'भूल भुलैया 2'मध्ये कार्तिकसोबत दिसली होती, त्यानंतर आता तृप्तीला चित्रपटात पाहण्यासाठी चाहते अधीर झाले आहेत.
तृप्ती डिमरी पहिल्यांदाच राजकुमार रावसोबत मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज आहे. 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या आगामी चित्रपटात तृप्ती राजकुमारसोबत दिसणार आहे.(pc:tripti_dimri/ig)