IPL 2023, Virat Kohli : आयपीएलमध्ये 'विराट' कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू, कोहलीनं मोडला रोहितचा विक्रम

आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) पाचव्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) आठ विकेट्सने शानदार विजय मिळवला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या विजयाचा हिरो ठरला विराट कोहली (Virat Kohli). बंगळुरुकडून कोहलीनं झंझावाती अर्धशतकं ठोकत 82 धावांची नाबाद खेळी केली.

बंगळुरुच्या घरच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळताना कोहलीचा धमाका पाहायला मिळाला. आरसीबीच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलत कोहलीने आयपीएलमध्ये विजयी सलामी दिली.
या सोबतच आयपीएलमध्ये विराट कोहलीने रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला आहे. विराटने मुंबईविरुद्धच्या सामन्यात 82 धावांची झंझावाती खेळी केली.
आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीने 150 प्लसच्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केली. अशाप्रकारे कोहलीने 23 व्या वेळा अर्धशतकं ठोकलं आहे.
रविवारच्या तुफान खेळीसह विराट कोहलीने 150 पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने 23 अर्धशतकं झळकावली आहेत. आतापर्यंत हा विक्रम भारतासाठी रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने आयपीएलमध्ये 22 वेळा 150 प्लसच्या स्ट्राईक रेटने अर्धशतकं झळकावली आहेत.
या यादीत तिसरं नाव महेंद्रसिंग धोनीचं आहे, ज्याने हा पराक्रम 19 वेळा केला आहे, तर सुरेश रैनानेही आयपीएलमध्ये 19 वेळा झंझावाती अर्धशतक पूर्ण केले आहे.
मुंबई इंडियन्सविरोधात सलामीला उतरलेल्या विराट कोहलीने 82 धावांची शानदार खेळी केली. विराटच्या दमदार खेळीमुळे रोहित शर्मानं ही त्याचं कौतुक केलं. रोहितनं कोहलीला मिठी मारत त्याची पाठ थोपटली.
रविवारचा दिवस विराट कोहलीने 'सुपर संडे'मध्ये बदलला. कोहलीने मुंबई इंडियन्सविरुद्ध 49 चेंडूंत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावांची तुफानी खेळी केली. यावेळी विराटचा स्ट्राइक रेट 167 पेक्षा जास्त होता.