Priyanka Chopra: 65 वर्षांपूर्वीच्या साडीपासून बनलाय प्रियांकाचा हा ड्रेस; पाहा फोटो
बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियांका आणि तिचा पती निक जोनास यांनी 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या भव्य उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रियांकानं तिच्या ग्लॅमरस लूकने अनेकांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी प्रियांकानं विंटेज ड्रेस परिधान केला होता.
प्रियांकाचा हा ड्रेस 65 वर्षांपूर्वीच्या साडीपासून तयार करण्यात आला आहे. प्रियांकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या ड्रेसच्या खास गोष्टींबाबत सांगितलं.
'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रियांकाने डिझायनर अमित अग्रवालनं डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता.
प्रियांकानं तिच्या ड्रेसचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन पोस्टमध्ये लिहिलं, 'हा सुंदर ड्रेस 65 वर्ष जुन्या विंटेज बनारसी पटोला (ब्रोकेड) साडीपासून बनवण्यात आला आहे. यात चांदीचे धागे आणि खादी सिल्कवर सोन्याचे इलेक्ट्रोप्लेटिंगचा वापर करण्यात आला आहे. '
पुढे तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'अमित आणि त्याच्या टीमचे धन्यवाद. हा ड्रेस अमित आणि त्याच्या टीमनं सहा महिन्यांमध्ये तयार केला आहे.'
प्रियांका लवकरच सिटाडेल या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
प्रियांका आणि निक जोनास हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.