हेनरिक क्लासेनचे वादळी शतक, अवघ्या 49 चेंडूत केली कामगिरी

हेनरिक क्लासेनच्या वादळी शतकाच्या जोरावर हैदराबादने 186 धावांपर्यंत मजल मारली. क्लासेनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यंदाच्या हंगामातील हे सहावे शतक ठरले....तर हैदराबादच्या संघाकडून दुसरे शतक होय.. हॅरी ब्रूक याने याआधी शतकी खेळी केली होती.

यंदाच्या हंगामात हेनरिक क्लासेन, हॅरी ब्रूक, वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल यांनी यंदाच्या हंगामात शतक झळकावलं आहे.
हेनरिक क्लासेन याने पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी केली. क्लासेन याने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. क्लासेन याने 51 चेंडूत 104 धावांची खेळी केली
या शतकी खेळीत क्लासेन याने आठ चौकार आणि सहा षटकार लगावले. क्लासेन याने आरसीबीच्या फिरकी गोलंदाजांची समाचार घेतला.
क्लासेनपुढे आरसीबीची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. क्लासेन याने मार्करम याच्यासोबत 50 चेंडूत 76 धावांची भागिदारी केली. यामध्ये क्लासेनचे योगनाद 58 धावांचे होते.
क्लासेन आणि हॅरी ब्रूक यांनी 36 चेंडूत 74 धावांची भागिदारी केली. यामध्ये क्लासेन याचे योगदान 46 धावांचे होते. क्लासनेच्या वादळी फलंदाजीच्या बळावर हैदराबादचा संघ सन्मानजक धावसंख्यापर्यंत पोहचला.