आरसीबी ग्रीन जर्सी घालून मैदानात का उतरते? काय आहे कारण
प्रत्येक हंगामाप्रमाणे यंदाही आरसीबी ग्रीन जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. संजूच्या राजस्थानविरोधात आरसीबी 23 एप्रिल रोजी ग्रीन जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. सोशल मीडियावर आरसीबीच्या ग्रीन जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या ग्रीन जर्सीमध्ये विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक दिसत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरसीबीने गो ग्रीनचा संदेश देण्यासाठी हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. गो ग्रीन मोहिमेंतर्गत ही सुरुवात करण्याता आली होती.
प्रत्येकवर्षी एका सामन्यासाठी आरसीबी ही जर्सी घालून मैदानात उतरत असते. आयपीएलच्या चौथ्या हंगामात आरसीबीचा कोच्ची टस्कर्सविरुद्ध पहिल्यांदा हिरव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरला होता.
2021 मध्ये आरसीबीच्या या परंपरेला खंड पडला होता. कारण, कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आरसीबीचा संघ निळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरला होता.
आरसीबीचा संघ प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला एक झाडही भेट म्हणून देतो.