Ahmednagar News: निघोजच्या मळगंगा यात्रोत्सवाला प्रारंभ
पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवीच्या तीन दिवशीय यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवसाला पावणारी देवी अशी ओळख असलेल्या देवीच्या दर्शनासाठी पाच ते सहा लाख भाविक येत असतात.
जगप्रसिद्ध रांजणखळगे पाहण्यासाठीही भाविक गर्दी करतात. निघोज येथील मळगंगा देवीच्या तीन दिवसीय यात्रोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे.
पुणे आणि नगर जिल्ह्याच्या मध्यावर असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी दोन्ही जिल्ह्यासह महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने भाविक काठ्या आणि पालख्या घेऊन दर्शनासाठी येतात.
विशेष म्हणजे देवीला हळद लागल्यानंतर देवीच्या पूजेचा मान महिलांना असतो.
मळगंगा देवीच्या मंदिरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध रांजणखळगे पाहण्यासाठीही भाविकांची मोठी गर्दी असते.
राज्य शासनाने या तीर्थ क्षेत्राला ब वर्ग दर्जा दिला असून यात्रेनंतरही पर्यटक हे रांजणखळगे पाहण्यासाठी येत असल्याने कुंडावर झुलता पूल उभारण्यात आला आहे.
रांजणखळग्याच्या दुसऱ्या बाजूला पुणे जिल्हा सुरू होतो तिथेही आज यात्रोत्सव भरला जातो.
या रांजणखळग्यांना स्थानिक भाषेत माऊली कुंड म्हणतात.
माऊली कुंडात स्नान केल्याने व्याधी बऱ्या होतात अशी काही भाविकांची धारणा आहे.