सिराजचा विकेटचा चौकार, फाफ-विराटची अर्धशतके, आरसीबीचा पंजाबवर विजय
विराट कोहली आणि फाफ डु प्लेलिस यांच्या वादळी अर्धशतकानंतर मोहम्मद सिराज याने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर आरसीबीने पंजाबचा पराभव केला आहे. 174 धावांचा बचाव करताना आरसीबीच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंजाबचा संपूर्ण डाव 150 धावांत संपुष्टात आला. पंजाबकडून प्रभसिमरन आणि जितेश शर्मा यांनी झुंज दिली. पण इतर फंलदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला.
आरसीबीने दिलेल्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. अथर्व तायडे पुन्हा एकहा फ्लॉप गेलाय. शिखर धवनच्या अनुपस्थितीत सलामीला येणाऱ्या अथर्व याला मोठी खेळी खेळण्यात अपयश आले. मोहम्मद सिराज याने अथर्व याला चार धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतर मॅथ्यू शॉर्टही 8 धावा काढून तंबूत परतला.
लियाम लिव्हिंगस्टोन यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो फक्त दोन धावा काढून बाद झाला. हरप्रीत सिह 13 धावांवर धावबाद झाला. कर्णधार सॅम करन 10 धावा काढून बाद झाला... शाहरुख खान याला 7 धावांचे योगदान देता आले. हरप्रीत ब्रार 13 आणि नॅथन इलिस एक धाव काढून बाद झाले.
जितेश शर्मा आणि प्रभसिमरन यांनी झुंज दिली. सुरुवातीला प्रभसिमरन याने आरसीबीच्या गोलंदाजांचा सामना केला. प्रभसिमरन याने 30 चेंडूत 46 धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने चार षटकार आणि तीन चैकार लगावले. तर मराठमोळ्या जितेश शर्मा याने 41 धावांचे योगदान दिलेय.
जितेश शर्मा याने 27 चेंडूत तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. जितेश शर्मा प्रभसिमरन यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावांचा पल्ला पार करता आला नाही. हरप्रीत सिंह, सॅम करन यांना चांगली सुरुवात मिळाली पण मोठी खेळी करता आली नाही.
मोहम्मद सिराज याने आज भेदक गोलंदाजी केली. पावरप्लेमध्ये दोन विकेट घेतल्या.. आणि अखेरच्या षटकात दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज याने चार षटकात 21 धावांच्या मोबदल्यात चार बळी घेतले. त्याशिवाय वानंदु हसरंगा याने दोन विकेट घेतल्या. वेन पार्नेल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.