IPL 2023 Points Table : चेन्नई आणि दिल्लीची उडी, गुणतालिकेत मुंबई आणि आरसीबीची स्थिती काय?
आयपीएलमध्ये (IPL 2023) रविवारी डबल हेडर सामने (IPL Double Header Match) खेळवण्यात आले. यानंतर आयपीएल गुणतालिकेत (IPL 2023 Points Table) बदल झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) वर विजय मिळवला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाने आरसीबीचा सात विकेट्स राखून पराभव केला.
आरसीबीचा (RCB) कर्णधार फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plesis) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूने 20 षटकांत 4 गडी गमावून 181 धावा केल्या.
दिल्लीने 16.4 षटकांत तीन विकेट गमावत 187 धावा करून सामना जिंकला. या विजयानंतर दिल्ली संघाने गुणतालिकेत उडी घेतली आहे. दिल्ली कॅपिट्ल्स आता दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर आरसीबी पाचव्या स्थानावर कायम आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) 10 सामन्यांत 14 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या चेन्नई (CSK) संघाकडे 13 गुण आहेत.
लखनौ (LSG) संघ तिसऱ्या स्थानावर कायम असून संघाकडे 11 गुण आहेत.
चौथ्या स्थानावर असणाऱ्या राजस्थान (RR) संघाकडे 10 गुण आहेत.
मागील सामन्यात पराभवानंतर आरसीबी आणि मुंबईला आयपीएल गुणतालिकेत टॉप 4 मध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. बंगळुरु (RCB) संघ पाचव्या तर मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघाकडे प्रत्येकी दहा-दहा गुण आहेत.
पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब किंग्स (PBKS) सातव्या क्रमांकावर आहे.
कोलकाता नाईट राईडर्स (KKR) आठव्या क्रमांकावर आहे.
आरसीबीचा (RCB) पराभव करुन दिल्ली (DC) संघ दहाव्या क्रमांकावरून उडी घेऊन आता दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
यामुळे हैदराबाद (SRH) संघाला झटका बसला आहे. सनरायजर्स हैदराबाद आता गुणतालिकेत सर्वात शेवटी दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.