Kohli-Ganguly : विराट आणि गांगुलीची हातमिळवणी, दिल्ली-बंगळुरू सामन्यानंतर दोघांमधील वाद मिटला?
RCB vs DC, IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 50 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) रॉयल चॅलेंजर्स बंगळरुवर (Royal Challengers Bangalore) 7 गडी राखून विजय मिळवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दोन संघांमध्ये झालेल्या मागील सामन्यात कोहली आणि गंभीर यांच्यात गरमा-गरमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आताच्या सामन्यानंतर या दोन खेळांडूमधील वाद संपल्याचं दिसून येत आहे.
इतकंच नाही तर विराट कोहली आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनीही सामन्यानंतर एकमेकांसोबत हस्तांदोलन केलं. या दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू असल्याचं बोललं जात होतं. मात्र, या दोघांच्या भेटीनंतर या वादावर आता पडदा पडला आहे.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 20 व्या सामन्यात दिल्ली आणि बंगळुरू संघ आमने-सामने आले होते. या शेवटच्या सामन्यात दोघांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता.
विराट कोहली माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे एकटक पाहत होता. सामन्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत हात मिळवणंही टाळलं होतं. एवढंच नाही तर दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.
दरम्यान, रविवारी (6 मे) सामन्यानंतर दोघांना हातमिळवणी करताना पाहून या दोघांमधील वाद शांत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या दोन दिग्गज खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं असलं, तरी ते एकमेकांसोबत बोलले नाहीत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं तर दोघांचाही चेहरा गंभीर दिसत होता.
विराट कोहलीने टी20 क्रिकेटचं कर्णधारपद सोडलं, तेव्हापासून कोहली आणि गांगुली यांच्यातील वाद समोर आला.
बीबीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलं होतं की, कोहलीने कर्णधारपद सोडत असल्यातं जाहिर केल्यावर त्यांनी असं करण्यापासून कोहलीला रोखलं होतं.
पण त्यानंतर कोहलीने यावर स्पष्टीकरण देत सांगितलं होतं की, गांगुलीने याबाबत कोणतीही चर्चा केली नाही.
याशिवाय एकदिवसीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद काढून घेताना कोणतीही चर्चा केली नाही. तेव्हापासून या दोघांमध्ये वाद सुरु असल्याचं बोललं जातं होतं