गिल ने जिता दिल... शुभमनने ऑरेंज कॅप तर घेतलीच, किंगच्या विक्रमाचीही केली बरोबरी
GT vs MI IPL 2023 Qualifier 2: शुभमन गिल याच्या वादळी शतकी खेळीच्या बळावर गुजरातने तीन विकेटच्या मोबदल्यात 233 धावांपर्यंत मजल मारली. शुभमन गिल याने मुंबईच्या गोलंदाजीची पिसे काढली. गिल याने 129 धावांची शानदार खेळी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्वालिफायर 2 सामन्यात शुभमन गिल याने शतकी खेळी केली. शुभमन गिल याने 60 चेंडूत 129 धावांची फलंदाजी केली. पहिल्या चेंडूपासूनच गिलने मुंबई इंडियन्सची गोलंदाजी फोडून काढली.
गिलच्या झंझावातापुढे मुंबईची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. शुभमन गिल याने 32 चेंडूत अर्धशतक झळकावले.. त्यानंतर पुढच्या 17 चेंडूत शतक झळकावले. शुभमन गिल याने 60 चेंडूत 10 षटकार आणि सात चौकाराच्या मदतीने शतकाला गवसणी घातली.
गिलच्या झंझावातापुढे मुंबईची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. शुभमन गिल याने 32 चेंडूत अर्धशतक झळकावले.. त्यानंतर पुढच्या 17 चेंडूत शतक झळकावले. शुभमन गिल याने 60 चेंडूत 10 षटकार आणि सात चौकाराच्या मदतीने शतकाला गवसणी घातली.
यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा कराणारा फलंदाज ठरलाय. गिल याने आरसीबीच्या फाफचा विक्रम मोडीत काढलाय. गिल याने 15 सामन्यात 722 धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यात गिल याने शतकी खेळी करत आठशे धावांचा पल्ला पार केला आहे.
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात ऑरेंज कॅप शुभमन गिल याच्याकडेच राहणार आता हे जवळपास निश्चित झालेय. आगाडीच्या पाच फलंदाजामध्ये सध्या खेळत असलेल्या संघातील फक्त डेवेन कॉनवे याचाच समावेश आहे. कॉनवेच्या नावावर 625 धावा आहेत. कॉनवेला अजून एक सामना खेळायचा आहे. या एका सामन्यात कॉनवे 150 पेक्षा अधिक धावांचे अंतर भरून काढावे लागेल, हे जवळपास अशक्यच आहे. त्यामुळे यंदाची ऑरेंज कॅफ शुभमन गिलकडेच राहणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
शुभमन गिल याने पहिल्या चेंडूपासून दमदार फलंदाजी केली. गिल याने आठ षटकार आणि चार चौकाराच्या मदतीने शतकाला गवसणी घातली. शुभमन गिल याच्या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
एकाच हंगामात एकापेक्षा जास्त शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गिल याची नोंद झाली आहे. याआधी हा विक्रम विराट कोहली आणि जोस बटलर यांच्या नावावर होता. बटलर आणि विराट कोहली यांनी एकाच हंगामात प्रत्येकी चार चार शतके लगावण्याचा विक्रम केलाय. आता या यादीत गिलचा समावेश झालाय.