DC vs SRH : हैदराबादच्या नवाबांना दिल्लीच्या पंटरने हरवले!
DC vs SRH : अटतटीच्या लढतीत दिल्लीने हैदराबादचा सात धावांनी पराभव केला.

DC vs SRH
1/10
अटतटीच्या लढतीत दिल्लीने हैदराबादचा सात धावांनी पराभव केला. सात सामन्यात दिल्लीचा हा दुसरा विजय होय. तर हैदराबादचा सात सामन्यात हा पाचवा पराभव झाला आहे. हैदराबाद आणि दिल्ली या गुणतालिकेतील तळाच्या दोन्ही संघाचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
2/10
या दोन्ही संघाला आयपीएलमध्ये आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. दिल्लीने दिलेल्या 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ सहा विकेटच्या मोबद्लयात 137 धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीकडून मुकेश कुमार याने अखेरचं षटक जबरदस्त टाकले. अखेरच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 13 धावांची गरज होती, मुकेश कुमार याने या षटकात एकही चौकार न देता दिल्लीला विजय मिळवून दिला.
3/10
दिल्लीने दिलेल्या 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली. हॅरी ब्रूक सात धावा काढून तंबूत परतला. 31 धावांवर हैदराबादला पहिला धक्का बसला. त्यानंतर मयंक आणि राहुल त्रिपाठी यांनी हैदराबादचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला.
4/10
इशांत शर्मा याने राहुल त्रिपाठी याला 15 धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतर एका बाजूला मयंक अग्रवाल याने दमदार फलंदाजी केली. पण अक्षर पटेल याने मयंकची खेळी संपुष्टात आणली. मयंक याने 49 धावांचे योगदान दिले. मयंक बाद झाल्यानंतर एडन मार्करम आणि अभिषेक शर्माही तंबूत परतले. अभिषेक शर्मा 5 तर एडन मार्करम तीन धावांवर तंबूत परतला.
5/10
आघाडीची फळी तंबूत परतल्यानंतर हैदराबादचा डाव अडचणीत सापडला होता. पाच बाद 85 धावसंख्यावरुन वॉशिंगटन सुंदर आणि हेनरिक कालसन यांनी डाव सावरला. कालसन याने 19 चेंडूत 31 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि तीन चौकार लगावले.
6/10
वॉशिंगट सुंदर याने नाबाद 24 धावांची खेळी केली. सुंदर याने 15 चेंडूत तीन चौकारासह 24 धावांचे योगदान दिले. पण सुंदर संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. हैदराबादकडून नॉर्खिया आमि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर कुलदीप यादव आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
7/10
image 7
8/10
image 8
9/10
मुकेश कुमार याला विकेट मिळाली नाही.. पण अखेरच्या षटकात त्याने इम्पॅक्ट गोलंदाजी केली.
10/10
दरम्यान, डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघाने निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 144 धावांपर्यंत मजल मारली. अक्षर पटेल आणि मनिष पांडे यांचा अपवाद वगळता एकाही फलंजाला 30 धावांचा पल्ला पार करता आला नाही. भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंगटन सुंदर यांच्या भेदक माऱ्यापुढे दिल्लीच्या फंलदाजंनी नांगी टाकली.
Published at : 24 Apr 2023 11:46 PM (IST)