PBKS vs LSG, Match Highlights : लखनौचा पंजाबवर दणदणीत विजय, गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकवर उडी
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानावर 56 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सवर मात केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलखनौ संघानं पंजाबला 258 धावांचं ल्ध्य दिलं होतं. लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवनचा संघ 19.5 षटकांत 201 धावांवर गारद झाला. लखनौनं हा रोमांचक सामना जिंकला.
या विजयासोबतच लखनौ संघाने गुणतालिकेत गुजरातला मागे टाकलं आहे. लखनौ संघ आता पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पंजाब किंग्स सहाव्या क्रमांकावर कायम आहे.
लखनौने दिलेल्या 258 धावांच्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने 201 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबकडून अथर्व तायडे याने एकाकी झुंज दिली. अथर्व तायडे याने अर्धशतक झळकावले.
अथर्वचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी विकेट फेकल्या. लखनौकडून यश ठाकूर याने चार विकेट घेतल्यात. तर नवीन उल हक याने तीन फलंदाजांना तंबूत धाडले.
258 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शिखर धवन एका धावेवर तंबूत परतला. त्यानंतर प्रभसिमरनही 9 धावा काढून बाद झाला.
एका बाजूला विकेट पडत असताना दुसर्या बाजूला तायडे धावा कूटत होता. अथर्व तायडे आणि सिकंदर रजा यांनी पंजाबच्या विजयाच्या आशा वाढवल्या होत्या. पण अथर्व आणि सिकंदर रजा एकापाठोपाठ बाद झाले.
अथर्व तायडे याने 66 धावांचे योगदान दिले. तर सिकंदर रजा याने 36 धावा केल्या. यामध्ये एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. लियाम लिव्हिंगस्टोन 23 धावांवर बाद झाला. तर सॅम करन याने 21 धावांचे योगदान दिले.
जितेश शर्मा याने 10 चेंडूत 24 धावा चोपल्या. या खेळीत जितेश शर्मा याने तीन षटकार मारले. राहुल चहर आमि कगिसो रबाडा यांना खातेही उघडता आले नाही. अर्शदीप दोन धावांवर नाबाद राहिला.
अथर्व तायडे याने वादळी फलंदाजी केली. शिखर धवन तंबूत परतल्यानंतर अथर्व मैदानात आला होता. 258 धावांचा पाठलाग करताना पंजाबला मोठा धक्का बसला होता.. अथर्व याने वादळी खेळी करत पंजाबच्या धावसंख्येला आकार दिला. अथर्व तायडे याने 36 चेंडूत 66 धावांची वादळी खेळी केली.