IPL 2023: विराट कोहलीची अर्धशतकी खेळी व्यर्थ, कोलकात्याने आरसीबीला पुन्हा हरवले
IPL 2023, RCB vs KKR: आरसीबीचे फलंदाज पुन्हा एकदा कोलकात्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. नीतीश राणाच्या नेतृत्वातील केकेआरने आरसीबीचा २१ धावांनी पराभव केला. २०१ धावांचा पाठलाग करताना आरसीबीचा संघाला २० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात १७९ धावांपर्यंत मजल मारली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविराट कोहली याने अर्धशतकी खेळी केली, पण इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला.
लीग सामन्यात कोलकात्याने तिसरा विजय मिळवला. या तीन विजयातील दोन विजय आरसीबीविरोधात मिळवले. फिल्डिंग आणि फलंदाजीमुळे सामना गमावल्याचे विराट कोहलीने सामन्यानंतर सांगितले. आरसीबीचे पाच फलंदाज फिरकी गोलंदाजांच्या चेंडूवर बाद झाले.
२०१ धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी दमदार सुरुवात केली होती. पहिल्या दोन षटकात ३० धावांचा पाऊस पाडला होता. पण तिसऱ्या षटकात सुयश शर्माने फाफला बाद केले. त्यानंतर शाहबाज अहमदही फार काळ मैदानावर टीकू शकला नाही. शाहबाज अहमद दोन धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल याला पाच धावांवर वरुण चक्रवर्तीने बाद करत आरसीबीच्या अडचणी वाढवल्या.
विराट कोहली आणि महिपाल लोमरोर यांनी आरसीबीचा डाव सावरला. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत विजयाकडे आगेकूच केली. पण
चौथ्या विकेटसाठी दोघांनी ३४ चेंडूत ५५ धावांची भागिदारी केली. आरसीबीची ही सर्वात मोठी भागिदारी होय.. त्याशिवाय इतर कोणताही मोठी भागिदारी झाली नाही. महिपाल लोमरोर याने १८ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. लोमरोर बाद झाल्यानंतर विराट कोहलीही लगेच तंबूत परतला विराट कोहलीने सहा चौकारासह ५४ धावांची खेळी केली.
विराट कोहली बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी पुन्हा ढेपाळली. दिनेश कार्तिक याने २२ धावांचे योगदान दिले. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सुयेश प्रभुदेसाई याने दहा धावांचे योगदान दिले. हसरंगा, विली आणि वैशाक यांनी आरसीबीचा मोठा पराभव टाळला.
कोलकात्याची फिरकी गोलंदाजांनी भेदक मारा केला. खासकरुन सुयेश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती यांनी आरसीबीचा अर्धा संघ तंबूत धाडला. सुयेश शर्माने पावरप्लेमध्ये दोन षटके गोलंदाजी केली. तर वरुण चक्रवर्ती याने डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. सुयश शर्मा याने चार षटकात ३० धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती याने चार षटकात २७ धावांच्या मोबद्लयात तीन विकेट घेतल्या. आंद्रे रसेल याने २९ धावांच्या मोबदल्यात दोन बळी घेतले.