IPL 2023 Final : आयपीएलचा महाअंतिम सामना, चेन्नई की गुजरात, आज कोण ठरणार विजेता?
रविवारी पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. सोमवारी आयोजित करण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोमवारी राखीव दिवशी आता आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात पहिल्यांच असं घडत आहे की, आयपीएलचा अंतिम सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे.
रविवारी पावसानं प्रेक्षकांची निराशा केली. आज 29 मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यावरही पावसाचं सावट आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier league) यंदाच्या सोळाव्या हंगामातील अंतिम सामना आज, 29 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे.
अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ आमने-सामने येणार आहेत. आजच्या सामन्यानंतर यंदाच्या मोसमातील विजेता मिळणार आहे.
आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईनं गुजरातचा पराभव केला. चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर (Chepauk Stadium) गुजरात टायटन्स (GT) वर मात करत चेन्नई सुपर किंग्स (CSK) अंतिम फेरीत प्रवेश केला.
आयपीएल 2023 च्या सलामी सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता. त्यानंतर आता अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत
यंदाचं गुजरात टायटन्सं संघाचं आयपीएलमधील दुसरं वर्ष आहे. गुजरात टायटन्स संघाने पदार्पणाच्या पहिल्याच वर्षी विजेतेपदावर नाव कोरलं. आयपीएल 2022 मध्ये पदार्पणातच गुजरात टायटन्सने आयपीएलचा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.
गेल्या वर्षी गुजरात आणि चेन्नई यांच्यात दोन सामने रंगले होते. दोन्ही सामन्यात गुजरात संघाने बाजी मारली होती. यंदाही गुजरात आणि चेन्नई दोन वेळा आमने सामने आले होते. यामध्ये दोन्ही संघाने प्रत्येकी एक-एक सामना जिंकलाय.
आतापर्यंत दोन्ही संघामध्ये चार सामने झाले आहेत. यामध्ये गुजरातने तीन तर चेन्नईने एका सामन्यात विजय मिळवलाय