IPL 2023 : आयपीएल 2023 च्या सांगता सोहळ्याला 'King'सह या स्टार्सची हजेरी, जल्लोषात पार पडणार कार्यक्रम

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या ग्रँड फिनालेला सुरुवात होण्यापूर्वी स्पर्धेच्या सांगता समारंभाकडे (IPL Closing Ceremony) सर्वांचे लक्ष असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
28 मे रोजी होणार्या या बहुप्रतिक्षित सामन्याने आयपीएल क्रिकेट हंगामाचा शेवट होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) आधीच समारोप समारंभासाठी सज्ज झालं आहे.

अनेक नामवंत कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. बॉलीवूड स्टार रणवीर सिंह आणि प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान यांचीही हजेरी लागण्याची शक्यता आहे.
बहुचर्चित आयपीएल 2023 (IPL 2023) चा आज समारोप होणार आहे. धूमधडाक्यात यंदाच्या हंगामाचा सांगता सोहळा पार पडणार आहे. 28 मे रोजी आयपीएल 2023 (IPL 2023) चा अंतिम सामना गुजरात आणि चेन्नई यांच्यात रंगणार आहे.
सामन्याआधी आयपीएलचा समारोप सोहळा पार पडेल. संध्याकाळी 6:00 वाजेपासून हा सोहळा सुरू होण्याची शक्यता आहे. याची अधिकृत वेळ समोर आलेली नाही.
आयपीएल 2023 च्या उद्घाटन समारंभाला (IPL Opening Ceremony 2023) अरिजित सिंह, रश्मिका मंदान्ना आणि तमन्ना भाटिया यांसारख्या स्टार्सनं हजेरी लावली होती. आज आयपीएलच्या सांगता समारंभही अनेक दिग्गज स्टार्स सामील होणार आहेत.
आजच्या आयपीएलच्या समारोपाच्या कार्यक्रमाला सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. भारतीय रॅपर डिव्हाईन, गायक किंग आणि इतर कलाकार या समारोप समारंभात परफॉर्मन्स करणार आहेत.
गायक जोनिता गांधी आणि न्यूक्लिया या सोहळ्याला हजेरी लागणार आहे. यासोबतच बॉलिवूड स्टार रणवीर सिंह आणि संगीतकार ए.आर. रहमान हेही या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवण्याची शक्यता आहे.
आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीचा रणसंग्राम आज, 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.