Virat Kohli : किंग कोहलीची 'विराट' कामगिरी; आणखी एक रेकॉर्ड केला नावावर
आयपीएलच्या 67 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सला (RCB vs GT) 8 गडी राखून मात दिली. या विजयात सिंहाचा वाटा उचलला तो आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीने
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुजरातच्या 169 धावांचा पाठलाग करताना विराटने 73 धावांची तुफान खेळी केली.
या खेळीसोबतच विराटने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
विराटने आयपीएलमध्ये (चॅम्पियन्स लीगमधील धावांसह) 7 हजार धावांचा टप्पा पार केला असून अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू आहे.
गुजरात विरुद्धच्या सामन्यापूर्वी विराटच्या नावावर आरसीबीकडून 6943 धावा (चॅम्पियन्स लीगमधील धावांसह) होत्या. त्यामुळे 57 धावा केल्यास आरसीबीकडून सात हजार धावा करणारा खेळाडू ठरणार होता.
त्यात त्याने 8 चौकार आणि 4 षटकारांसह 73 धावा करत हा विक्रम मोडत 7016 धावा नावे केल्या.
यंदाच्या हंगामात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नसली तरी गुजरातविरुद्ध त्याने 73 धावा ठोकत फॅन्सना खूश केलं आहे.
त्यामुळे 14 सामन्यात कोहलीच्या नावावर 309 धावा जमा झाल्या आहेत.
यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीचा सर्वोत्कृष्ट धावसंख्या 73 झाली आहे.
विराटच्या या खेळीच्या जोरावर आरसीबी सामना जिंकत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यात यश मिळवलं आहे.