IPL 2022 : 'या' दोन संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित, कोणत्या संघाची स्थिती काय?
यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ सामिल झाले असून या 10 पैकी 4 संघ पुढील फेरीत पोहोचतील. यात गुजरात टायटन्स संघाने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्याती केवळ एक सामना गमावला आहे. त्यामुळे त्यांनी एकूण आठ सामना जिंकल्याने त्याच्या खिशात 16 गुण असून त्यामुळे त्याचं पुढील फेरीत जाणं जवळपास निश्चित झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याचनुसार नव्याने आयपीएलमध्ये सामिल झालेल्या लखनौ संघाने देखील आतापर्यंत 10 पैकी 7 सामने जिंकत 14 गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे त्यांच्या उर्वरीत 4 सामन्यांपाकी त्यांनी एकही सामना जिंकल्यास ते पुढील फेरीत नक्कीच पोहचू शकतात.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 9 पैकी 8 सामने गमावले आहेत. त्यामुळे ते केवळ 2 गुणांसह दहाव्या स्थआनवर आहेत. त्यामुळे ते त्याचे उर्वरीत सहाच्या सहा सामने जिंकल्यासही प्लेऑफमध्ये पोहचू शकत नाहीत.
त्याचनुसार चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघानी त्याचे 6-6 सामने गमावले आहेत.
त्यामुळे त्यांना त्यांचे उर्वरीत सर्वच्या सर्व सामने चांगल्या रनरेटनी जिंकावे लागेल, त्यामुळे त्यांच पुढील फेरीत पोहोचणं अवघडचं आहे.
वरील पाच संघ सोडल्यास उर्वरीत राजस्थान, हैदराबाद, दिल्ली, पंजाब आणि बंगळुरु या संघामध्ये पुढील फेरीत पोहचण्याची चुरस आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 6 सामने जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.
तसंच सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु संघाने प्रत्येकी 5-5 सामने जिंकत ते देखील पुढील फेरीत पोहचण्याच्या जवळ आले आहे.
त्यामुळे बंगळुरु-हैदराबाद या दोघांनाही उर्वरीत सामन्यात कमाल कामगिरी करणं महत्त्वाचं आहे.
तर या शर्यतीत सर्वात मागे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स असून त्यांनी 4-4 सामनेच केवळ जिंकले आहेत.
त्यामुळे या उर्वरीत संघाना शक्य तितके अधिक सामने जिंकून पुढील फेरीत पोहचण्याची संधी आहे.